कलिंगडाचे लाडू (डेझर्ट)
साहित्य - 1 तुकडा कलिंगड, पाव किलो पनीर, 100 ग्रॅम पिठीसाखर, 4 स्पाईस पाव, 1 मोठा चमचा दूध
कृती - पनीर किसून घेणे
. त्यात कमी-जास्त प्रमाणात चवीनुसार पिठीसाखर घालणे.
त्यात पावाच्या कडा काढून दूधात भिजवून पनीर व पिठीसाखरेमध्ये टाकणे. हे मिश्रण चांगले मळून घेणे. ते हातावर थापून त्यात कलिंगडाचा लाडुच्या आकाराचा गोल तुकडा ठेवणे व लाडू आकारात वळून फ्रिजमध्ये ठेवणे. डेझर्ट म्हणून हा अतिशय चांगला व करायला सोपा असा अनोळखी पदार्थ आहे. यात कलिंगडाशिवाय इतर कोणतेही फळ वापरून लाडू बनवू शकता. या सामुग्रीपासून 15-16 लाडू बनतात.
गव्हाच्या पिठाची कॅडबरी
साहित्य - 3 वा
ट्या गव्हाचे पीठ, 1 वाटी कोक पावडर, 3 वाट्या साखर, 1 वाटी लोणी, अर्धा वाटी काजू-पिस्ता-
विरघबेदाणे, 1 कप मिल्क पावडर
कृती - गव्हाचे पीठ, कोक पावडर व मिल्क पावडर एकत्र चाळून घेणे. एका कढईत अर्धा कप पाणी घेऊन त्यात साखर घालून गॅसवर ठेवणे. एक उकळी येऊन साखर ळल्यानंतर त्यात लोणी घालणे व त्यालाही एक उकळी काढणे. यात काजू, पिस्ता, बदाम, बेदाणे, चाळलेले पीठ हळूहळू एकत्र करणे. त्याचा घट्ट गोळा होत आला की कॅडबरीच्या साच्यात तूप लावून त्यात हे मिश्रण ओतणे. चांगले 5-6 तास झाले की डब्यात ठेवून हवे तेव्हा चवीने खाणे. थंड नसलेली, पण पौष्टिक अशी ही कॅडबरी मुलांना द्यायला मातांना फार आवडेल.
बोराचे घरगुती चॉकलेट्स
साहित्य - अर्धा किलो जळगावची मोठी बोरे, दीड वाटी साखर, अर्धा वाटी चॉकलेट किंवा कोको पावडर, अर्धा वाी मिल्क पावडर, पाव वाटी लोणी, काजू, बदाम, पिस्ता, वेलची पावडर.
कृती - प्रथम बोरे स्वच्छ धुवून घ्या. त्याचा किस करून तो कडकडीत उन्हात वाळवा. म्हणजे तो कुरकुरीत झाला पाहिजे. किसाचे मिक्सरवर बारीक कुट करा. चाळणीने चाळून घ्या. अर्धी वाटी बोरकुट एका कढईत घेऊन त्यात साखर, कोको पावडर, मिल्क पावडर, लोणी मिसळून गॅसवर ठेवा. सुरुवातीला गॅस मोठा ठेवा. मिश्रणाला थोडे पाणी सुटायला लागले की गॅस कमी-जास्त करायला हरकत नाही. मिश्रण सारखे हलवत राहा. मिश्रण थोडे घट्ट झाले की त्यात काजू, बदाम, पिस्ता, वेलची पावडर घालून सारखे करून एका पसरट छोट्या ताटात व चॉकलेट मोल्डमध्ये तुपाचा हात फिरवून गरम असतानाच ओता आणि पसरावा. थर मध्यम असू द्या. मश्रिण थोडे कोमट झाल्यावर फ्रिजमध्ये तासभर ठेवा व खायला द्या.
केळफुलाचा मेदूवडा
साहित्य - 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी शिजवलेली केळफुलाची भाजी, मिरची, आल, लसूण, कोथिंबीर, कडिपत्ता 1 मोठा चम
चा, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, हळद, तिखट, चवीनुसार मीठ, तळायला तेल, खोबर्याचे बारीक तुकडे.
कृती - उडीद डाळ चार तास भिजवून ठेवणे. नंतर ते बारीक वड्याच्या पीठासारखे वाटून घेणे. त्यात शिजवलेली केळफुलाची भाजी, बारीक मिरची, कोथिंबीर, खोबर्याचे बारीक तुकडे, गरम मसाला, मिरची पावडर, हळद सगळे मिश्रण करून मेदूवड्याचा आकार देऊन तळून घेणे व खोबर्याची चटणी व सांबर बरोबर सर्व्ह करणे.
टिप्स - केळफुलाचा वा
पर रोजच्या खाण्यात कमी असतो. वड्याच्या निमित्ताने केळफुलाची चव चाखली जाईल.
बांगडा पॅटीस
साहित्य - बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा मिरची, 1 मोठा चमचा आले-लसूण पेस्ट, 1 अंडे, 2 बारीक चिरलेले कांदे, 100 ग्रॅम
ब्रेड्युम्प पावडर, चिमुटभर मीठ, धुवून स्वच्छ केलेले दोन बांगडे मासे.
कृती - प्रथम गॅसवर दोन कप पाणी ठेवून त्यात धुवून स्वच्छ केलेला बांगडा घालावा. 5 मिनिटे उकळू द्यावे. त्यानंतर पाणी काढून टाकून बांगडा मास्याचे
काटे साफ करून घ्यावे. त्यात कापलेली मिरची, कोथिंबीर, आले-लसूण पेस्ट,
बारीक चिरलेला कांदा, हळद, मीठ घालून चांगले मळून घ्यावे. त्याला पॅटीसचा आकार देऊन अंड्याच्या बलकामध्ये बुडवून काढावे व ब्रेड्युम्प पावडर लावून तव्यावर शॅलो फ्राय करावे. गरमा-गरम चटणीसोबत खावयास द्यावे.
टीप्स - बांगडा म्हटले की नाक मुरडणार्या मुलांसाठी हा एक वेगळ्या प्रकारचा पदार्थ बनू शकतो. खूप खर्च करून वाटाणा किंवा खिमा पॅटीस करण्यापेक्षा कमी खर्चात घरच्याघरी पॅटीस बनवून लोकांची वाह वा मिळवता येते.
मशरूम-कॉर्न पिकल (लोणचे)
साहित्य - 200 ग्रॅम मशरूम, 100 ग्रॅम कॉर्न, चार हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 2 चमचे आले व लसणाचे लहान लहान तुकडे, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा तेल, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे
लिंबाचा रस.
कृती - मक्याचे दाणे वाफवून घ्यावेत. मशरूमचे मध्यम तुकडे करून चिरून घ्यावेत. कढईत तेल वाफवून घेणे व त्यात आले, लसूण, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर हे
सर्व मिश्रण गुलाबी रंगात परतून घेणे. त्यात मशरूम, मक्याचे दाणे घालून एक वाफ काढून घेणे. त्यात मिरची पावडर, हळद, मीठ घालून परतून घ्यावे. शेवटी लिंबाचा रस घालावा. तयार झाले चमचमीत लोणचे.
टीप्स - हे लोणचे 8 ते 10 दिवस सहज टिकते. घरीच नव्हे तर प्रवासातसुद्धा उपयोगी येते.
न्युट्रीशिअस सोया थालीपीठ
साहित्य - OATS 200 ग्रॅम, 100 ग्रॅम सोयापीठ, 100 ग्रॅम नाचणी पीठ, 50 ग्रॅम भाजणी पीठ, 100 ग्रॅम मोड आलेली मटकी
व मूग, 1 मोठा चिरलेला कांदा तसेच बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर, मीठ, शॅलो फ्राय करण्यात
तेल.
कृती - प्रथम मूग-मटकी एक वाफ काढून घ्यावे. वरील इतर साहित्य व वाफ काढलेली मूग व मटकी एकत्र करून नॉन स्टिकच्या त
व्यावर कमी तेलात थालीपीठ थापावे. ही थालीपीठे ओव्हनमध्येसुद्धा चांगली होतात.
टीप्स - अतिशय न्युट्रीशस व डायेटेबल थालीपीठ आहे. यात बीट, गाजर वापरून मुलांना डबा म्हणून देऊ शकता. तसेच डायेटसाठीही उपयुक्त आहे.
- वीणा प्रभु
No comments:
Post a Comment