आमच्याविषयीशब्दांकित प्रतिभा’ दिवाळी अंकाचे यंदा तिसरे वर्ष. जनाजनातील प्रतिभा शब्दबद्ध करून मांडता यावी, हा या अंकाचा उद्देश आहे. म्हणूनच नवोदितांच्या साहित्याला तसेच अनेक दुर्लक्षीत विषयांत हात घालण्याचा आमचा प्रयत्न असतो.
यंदाच्या दिवाळी अंकात ‘वैभवशाली भारत - पुरातन ते चिरंतन’ हा मध्यवर्ती विषय घेण्यात आला आहे. यात आपल्याला स्वामी विवेकानंद, माजी राष्ट्र
पती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदी मान्यवरांचे भारताच्या वैभवशाली रूपाबद्दल मांडलेली मते वाचायला मिळतील. श्री. सुरेश सोनी, शशीकांत कविश्‍वर व इंदूमती काटदरे यांनी वैभवशाली भारताचा विविधांगांनी वेध घेतला आहे.
अण्णा हजारे यांचे नुकत्याच झालेल्या आंदोलनाने सारा देश भारला गेला होता. अशाच प्रकारची दोन व्यापक जनआंदोलने यापूर्वी झाली आहेत. भूदान चळवळ, नवनिर्माण आंदोलन व अण्णांचे आंदोलन या तिन्हींतील साम्य स्थळांचा व भेदांचे विश्‍लेषण केले आहे डॉ. ल. ना. गोडबोले यांनी.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांची व त्यांच्या कार्याचीही ओळख आपल्याला या अंकातून करून देत आहोत. भारतीय परिभाषेत ‘सेवा’ ही परमोच्च संकल्पना मांडली आहे अरुण करमरकर यांनी.
‘शब्दांकित प्रतिभा’ येत्या वर्षप्रतिपदेपासून वेब-मासिक रूपात प्रकाशित होणार आहे. युनिकोड फॉर्मेटमध्ये आपल्या मासिक रूपात याच संकेतस्थळावर वाचता येतील. ‘शब्दांकित प्रतिभा’ वेब मासिकाचा विषय हा ‘क्रिएटिव्हिटी’ असणार आहे... सर्जनशील समाजच वैभवशाली राष्ट्र घडवू शकते, अशी आमची धारणा आहे.

No comments:

Post a Comment