23 November 2010

मुंबई ते अमेरिका


सन 1996 पासून वेगवेगळे कंन्सल्टंट पाठी लागले होते की बंगळुरू नाही तर डायरेक्ट अमेरिकेला जॉब देतो. कॉलेजमधले अर्धेअधिक मित्र त्याच मार्गावर होते, पण चक्क अमेरिकेत जाऊन जॉब करायचा इतके मला अमेरिकेचे आकर्षण नव्हते. कदाचित तितका उत्साह, जिद्द किंवा धाडसही नव्हते.

‘नेकलो’ कंपनी बुडीच्या मार्गावर असल्यामुळे 1998 साली ‘एल.टी.टी.एल.’ ही कंपनी जॉइन केली. तिथेसुद्ध कम्युनिकेशन ग्रुपला लोक उठसूठ फॉरेनलाच जात असत. पाच-सहा महिन्यांनी मीही अमेरिकेला काम करण्यासाठी ऍप्लिकेशन दिले. काम करण्याची परवानगी मिळालीही, पण मला मिळणारा प्रोजेक्ट बहुधा ऑफ शोअर म्हणजे भारतात चालणाराच होता. 1999 साली ‘एल.टी.’ने कहरच केला. अमेरिकेच्या आशा दाखवून बंगळुरूमधील ‘मोटोरोला’ कंपनीत कामाला धाडले. बंगळुरूमध्ये एक-दोन महिने काम काढल्यावर पुन्हा इंटरव्हू द्यायला सुरुवात केली आणि लगेचच ‘एम.बी.टी.’ची ऑफर मिळाली. बंगळुरूच्या दोन महिन्यांच्या वास्तव्यात काही नाही तर दक्षिणेकडील म्हैसूर, उटी, तिरुपती अशी प्रेक्षणीय व तीर्थस्थळे बघून घेतली.

‘एम.बी.टी.’मध्ये पहिले दोन-तीन महिने काहीच काम नव्हते, पण अचानक 1999 च्या ऑगस्ट महिन्यात लंडनला तीन महिन्यांच्या असाइन्मेंटवर जाण्याचा योग आला. थोडक्यात पहिला परदेश दौरा अमेरिकेत न होता, लंडनला झाला. पुढे 2000 साली एक वर्षभर त्याच असाइन्मेंटसाठी लंडनला राहणे झाले. लंडनमध्ये वास्तव्य असताना स्कॉटलंड, इंग्लंडमधील काही भाग, युरोपमधील काही देश फिरणे झाले. साधारणत: वर्ष-दीड वर्षांचा काळ काढल्यामुळे युके व युरोपच्या लोकांचे चालणे, बोलणे, राहणीमान, त्यांच्या समस्या यांचे आकलन झाले. तिथे असताना अमेरिकेतल्या मित्रांशी बर्‍याचदा गप्पा व्हायच्या. त्यात असे लक्षात यायचे की अमेरिका काही तरी वेगळे प्रकरण आहे.

भारतात परत आल्यावर एक-दोन वर्ष कुठे परदेशात जायचे नाही, असे सांगून टाकले होते, पण मनात एक विचार यायचा की अमेरिकेला जायचा चान्स मिळाला पाहिजे म्हणजे त्या ऐकीव गोष्टी अनुभवता येतील.

मला अमेरिकेला जायचे आहे हे आमच्या सीसी चीफला माहीत होते. म्हणून तिने एकदा बोलावले; अशी अशी असाइन्मेंट आहे, ‘‘बट यू हॅव्ह टू बी विथ ब्रिफकेस. जाशील का?’’ थोडक्यात कुटुंबाबरोबर जाता येणार नाही. लगेच नकार दिला.

माझे कंपनीत कन्फर्मेशन झाले. ठरल्याप्रमाणे प्रमोशन मिळावे म्हणून चंद्रशेखर, डॉ. द्विवेदी अशांशी बराच भांडलो. प्रमोशनची चिन्हे दिसत होती. चंद्रशेखर म्हणाला एक काम करूया, तू अमेरिकेत जाऊन दोन महिने प्रोडक्ट ट्रेनिंग घेऊन ये आणि इथे आल्यावर पुढच्या बॅचेसना ट्रेनिंग दे, म्हणजे मग तुझे प्रमोशनपण जस्टिफाइड राहील. विचार केला दोन्ही गोष्टी साध्य होत आहेत अमेरिका बघणे पण होईल आणि प्रमोशनपण! तरी एकदा अर्धांगिनीची परवानगी घेतली आणि दोन दिवसात ऑफिसला होकार कळवला. या असाइन्मेंटला माझी निवड होण्यापूर्वी तीन-चार जण क्लाइंट इटरव्ह्यूमध्ये फेल झाले होते, त्यामुळे सतत तीन दिवस सुनिल आनंदने सतत तीन दिवस आमची इंटरव्हूची तयारी करून घेतली. तयारी नाही रिहर्सलच म्हणा! प्रत्यक्ष इंटरव्ह्यूसुद्धा चांगला झाला. नेमका त्याच दिवशी माझ्याबरोबर आणखी दोन मुलींचा इंटरव्ह्यू झाला आणि आम्ही सगळेच जण त्यांना आवडलो. त्यांनी कोणाला पाठवायचे हा निर्णय कंपनीवर सोपवला. कंपनीने तो चान्स प्रिया सुतार या मुलीला द्यायचे ठरवले आणि आमच्या तोंडचा आलेला घास पळवला. अमेरिका दौरा नाही तर प्रमोशन तरी पदरात पडले. एकीकडे प्रमोशन, पण दुसरीकडे प्रमोशन नाही, म्हणून एके दिवशी अरविंद पांडेंनी मला बोलावले आणि पुढील सहा महिने तू ‘कॅनॉन’ प्राजेक्टवर काम करायचे अशी ऑर्डर काढली.

अमेरिका दौरा इतक्यात तरी आपल्या नशिबात नाही असे वाटू लागले. पाहिजे तेव्हा मिळाले तर स्ट्रगल काय करणार? ‘कॅनॉन’ प्रोजेक्टवर जवळजवळ दहा महिने सरले. मी संजयला मध्ये मध्ये हिंट देत होतो की माझ्यासाठी काही बघा. पण काही होईल अशी चिन्ह नव्हती. 11 मेला मी कॉम्प्युटर बंद करून घरी निघालो इतक्यात संजयने मला बोलावले, ललिथालाही (बंगळुरूला मी जास्त काळ राहिलो असतो तर मीही अजिथ झालो असतो) बोलावले आणि म्हणाला, ‘‘अजित, उद्यापासून तुला दुसरे प्रोजेक्ट पाहायचे आहे; अर्थातच त्यामुळे तू तुझे काम हिच्याकडे हॅण्डओव्हर कर. एक आश्चर्य वाटले की अचानक काय झाले, पण थोडी कळीपण खुलली, कारण संजय आणि कॅनॉन दोघांच्या चक्रव्युहातून सुटका होणार होती. 12 मेला आमचे डिलिव्हरी हेड सतीश राव यांना भेटलो आणि प्रोजेक्ट काय आहे हे समजून घेतले. तिथून निघता निघता त्याने बॉम्ब टाकला, अरे तुझा अमेरिकेचा व्हिजा आहे ना? पहिले दोन आठवडे क्लाइंट व्हिसिट आहे. व्हिसा नाही म्हटल्यावर तोही विचारात पडला. तातडीने पेपर सबमीट कर असे सांगितले. दुसर्‍या दिवशी मी प्रोजेक्ट किक-ऑफचे प्रेझेंटेशन दिले. पुन्हा किक-ऑफमध्ये प्रश्‍न निर्माण झाला की अजितचा व्हिसा नाही. म्हणजे क्लाइंटला दिलेल्या शब्दाप्रमाणे व्हिसीट होणार नाही. दुसरीकडे सतीशने मला व्हिसा ऍप्लिकेशन भरायला सांगितले. पहिल्या आठवड्यात अमेरिकास्थित कोणीही माणूस क्लाइंटला भेटेल आणि मग आठ-पंधरा दिवसांनी व्हिसा आल्यावर अजित जाईल, असा तोडगाही काढला आणि पहिला क्लाइंट कॉल 14 मेला नक्की झाला. 14 ला मी माझ्या तयारीनिशी सतीशकडे गेलो. बघतो तर काय, टेलिकॉन ग्रुपमधील आणखी एक मुलगा आलेला. क्लाइंट तयार नसेल तर माझ्याऐवजी त्याला पाठवायचे, असे कंपनीच्या टॉप बॉसेसने निर्णय घेतले होते. मला अगदी मनापासून वाटू लागले की बहुधा अमेरिका आपल्या नशिबातच नाही. सतीश मात्र या मतावर ठाम होता की मीच हे प्रोजेक्ट बघायचे. त्याने क्लाइंटला पटवले की आठ-पंधरा दिवसांनी अजित आला तर उलट चांगले, कारण तो पूर्ण तयारीनिशी येईल. देव पावतो तसा क्लाइंट पावला आणि त्यांनी सतीशच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब केला. थोडक्यात अमेरिकावारीवर आलेले काळे ढग दूर झाले आणि पुन्हा अमेरिकेचे आभाळ दिसू लागले.

दिनांक 9 रोजी व्हिसा इंटरव्ह्यूची डेट निश्चित झाली. 9 तारीख लांब होती, पण हळूहळू नवीन बूट, जीन्स अशा एक-एक गोष्टी बघायला सुरुवात केली. मूड बन रहा था। एक टेम्पो था। पण तब्येत थोडी साथ देत नव्हती. मानदुखी आणि युरीन इन्फेक्शन, त्यात नवीन प्रोजेक्टमुळे कामाचाही ताण वाढत होता. अमेरिकेचा व्हिसा कधी नाकारला जाईल हे सांगता येत नाही. देहानेही सत्त्वपरीक्षा बघायचे ठरवले की काय? नेमकी रात्री आजी पडली आणि पायाचे हाड मोडले. डॉक्टरांनी ऑपरेशनशिवाय गत्यंतर नाही असेच निदान केले. आजीचे वयही इतके होते की लगेच निर्णय घेणे शक्य नव्हते. निर्णय होत नव्हता. आत्या, काका, काकू सगळे आले. अखेर ऑपरेशन करायचे ठरले. देवाच्या कृपेने ऑपरेशन यशस्वी झाले.

दि. 9 ला इंटरव्ह्यू म्हणून 8 ला ऑफिसमध्ये अर्धा अधिक वेळ त्याच्याच तयारीत गेला. जन्मापासून ते आतापर्यंतची सगळी कागदपत्रे गोळा करायची होती. प्रत्यक्ष 9 ला सकाळी 8.30 ची अपॉइन्टमेंट होती. बरोबर 8.15 ला अमेरिकन एम्बसीमध्ये पोहोचलो. 8.30-8.40 पर्यंत टोकन मिळाले आणि 8.50 ला विंडो क्र. 3 वर मला इंटरव्ह्यूसाठी बोलावले.
‘‘गुड मार्निंग’’
‘‘गुड मॉर्निंग, हाऊ आर यू?’’
‘‘आय एम फाईन, थँक्स.’’
‘‘व्हाय डिड यू ट्रॅव्हेल यु.एस. फर्स्ट टाइम?’’
‘‘आय डिडन्ट ट्रॅव्हेल अक्चुली. आय जस्ट हॅड हाय स्टँडेड.’’
‘‘व्हिच इज युअर क्लाइंट?’’
‘‘रेडिएंट एसएमएस हॅण्ड्स’’
‘‘डू यू हॅव्ह बिझनेस कार्ड?’’
‘‘हिअर यू गो...’’
‘‘थँक्स मि. वर्तक, युअर व्हिसा विल बी कॅरिड टू सेड ऍड्रेस.’’
हा! सुटकेचा निश्वास टाकला. केवळ मोजक्या तीन-चार प्रश्‍नात व्हिसा मिळाला, विश्वासच बसत नव्हता. लगेच कंपनीत आलो. सीमा व सतीश यांना सांगितले की व्हिसाचे काम झाले आहे. आता ठरल्याप्रमाणे 11 ला उड्डाण करतो.

मेलवीनला आधीच विनवणी करून ठेवल्यामुळे (फ्री) करन्सीपण त्याच दिवशी मिळाली. पहिल्यांदा यु.एस. डॉलर हातात पडले. आता फक्त पासपोर्ट आणि तिकीट बाकी, मी अमेरिकेला नक्की येतो आहे, असे मित्रांना कळवले आणि विकेंडला कुठे फिरायचे याची चक्र सुरू झाली.
दि. 9 व 10 घाईगडबडीत गेले. एअरपोर्टला जायचे म्हणून गाडीची डागडुजी करून दाना-पानी (पेट्रोल) भरून ठेवले. माझा मित्र नरेंद्र सोडायला येणार होता 10 तारखेला रात्री 10 वाजता.

मध्यरात्री 1.55 चे फ्लाइट होते. 1.30 झाला तरी सेक्युरिटी चेक इनसाठी बोलावले नाही. मीच कंटाळून सेक्युरिटी चेक करून घेतले. बसलो तर शेजारचा माणूस विचारू लागला ‘‘कुठे जाणार?’’
म्हटले ‘‘ऍटलंटा.’’
‘‘वाह छान! नोकरी का?’’
‘‘हो. तुम्ही कशासाठी?’’
‘‘माझा वायरिंगचा व्यवसाय आहे.’’

काही वर्षांपूर्वी मी यु.एस.च्या फक्त सेनिमारला गेलो होतो आणि तिथे एकाने पार्टनरशीपची ऑफर दिली होती. खरंच भारतीय जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचली आहेत. त्याच्याबरोबर गप्पा मारण्यात बराच वेळ गेला एवढ्यात डेल्टाची अनाऊंसमेंट झाली की विमान थोडे उशिरा आल्यामुळे दिलगिरी व्यक्त करत आहोत. डेल्टामध्ये खाण्याची सरबराईच होती. मुंबई ते पॅरीस साडेनऊ तासांचे अंतर होते. विमान पॅरीसच्या ‘चालसडी गोल्फ’ विमानतळावर उतरले. पॅरीसहून अमेरिकेला जाणारे बरेच प्रवासी होते. फोटोग्राफीची आवड असल्यामुळे विमानतळावर काही फोटो काढले.

11.30 ला पॅरीस अटलांटाच्या कनेक्टींग फ्लाइटमध्ये शिरलो. बोईंग 777 विमान होते. शेजार्‍याने विचारले ‘‘आर यू फ्रॉम इंडिया?’’ ‘‘येस.’’ हळूहळू गप्पा वाढू लागल्या. बेसिकली तो अमेरिकेत शिकत होता. अमेरिकेत सिटीझनशीप मिळवण्याच्या मागे होता तो. त्याच्याशी गप्पा मारता मारता वेळ छान गेला. तेवढ्यात पेयपानाची वेळ झाली. त्याने ‘टॉमेटो स्पाईसी’ मागितले. मी बघतच बसलो. टॉमेटो सूप माहीत होते, पण ज्यूस नवीनच होते. मी आपले ऍपल ज्यूस घेतले. थोड्या वेळाने हवाईसुंदरी ग्लास उचलायला आली. बघितले तर शेजारच्या रवीचे ‘स्पाईसी टॉमेटो’ हललेही नव्हते. तिने विचारले, ‘‘डू यू वॉन्ट एनिथिंग एल्स?’’ एवढा प्रोऍक्टीव्हपणा बघून मी थक्कच झालो.

-----
आज अमेरिकेतील पहिला दिवस... क्लाइंट व्हिसिट कशी राहील याची उत्कंठा होती. हॉटेल मॅनेजरला सांगून टॅक्सी बुक केली. 9.30 ऐवजी 10 ला ऑफिसला पोहोचलो. सिक्युरिटी गार्डकडे कार्ड दिले आणि कॉलिन शोडरला भेटायचे आहे. तो म्हणाला थांब मी त्याला घेऊन येतो. थोड्या वेळाने एक साडेसहा फूटी माणूस ट्रॉली ओढत आला. मला कळेना हा कोण? त्यानेच ‘हाय अजित!’ केल्यावर लक्षात आले हा कॉलिन असावा. त्याची वेशभुषा कुठल्याही अँगलने वाटले नाही की हा कॉलिन आहे.

कॉन्फरन्स रूममध्ये माझ्या कॉम्प्युटरची सोय केली होती. मुंबई ऑफिसला कळवले. दुपारी लंचमध्ये व्हेज काही नसल्यामुळे शेजारच्या हॉटेलमध्ये जाऊन व्हेज सॅण्डविच खाल्ले. 4.30 वाजता कॉलिन निघून गेला. इतक्या लवकर जाऊन काय करणार म्हणून मी प्रोडक्ट इन्स्टॉलेशन स्टेप्स मेल केल्या. सकाळी टॅक्सीने येताना साधारण रस्ता पाहिला असल्यामुळे चालत जाण्याचा प्लान केला.
अमेरिकेला जाण्याचा 1996 सालापासून सुरू झालेला हा प्रवास... आज अमेरिकेत नोकरीचा पहिला दिवस संपूवन मी अमेरिकेच्या ‘फ्री वे’वरून (हायवे) चालत हॉटेलवर येऊन संपवत होतो.

- अजित वर्तक
जयस सोसायटी, जयप्रकाश नगर,
गोरेगाव (पू.) मुंबई - 400 063
भ्रमणध्वनी :99678 99049

22 November 2010

शब्दांकित प्रतिभा दिवळी अंक - २०१०

कला संघटक ‘संस्कार भारती’


साहित्य, ललित आणि रंगमंचावरील उच्च दर्जाच्या अभिरूचीसपन्न असलेल्या कलांच्या सादरीकरणाच्या माध्यमातून संपूर्ण समाज संघटित करण्याचे आणि संघटित समाज संस्कारीत करण्याचे काम ‘संस्कार भारती’ करत आहे. ‘संस्कार भारती’ कला क्षेत्रात काम करणारी, कलाकारांचे संघटन करणारी, कौटुंबिक भावना असलेली राष्ट्रव्यापी संघटना आहे. संपूर्ण देशात राज्या-राज्यांत ‘संस्कार भारती’चे संघटनात्मक काम मोठ्या प्रमाणात यशस्वीरीत्या सुरू आहे.

समाजातील ज्येष्ठ, श्रेष्ठ, व्यावसायिक, अव्यवसायिक नवोदित कलाकारांना एकत्र आणून, त्या त्या कलाकारांच्या कलेच्या सादरीकरणातून; कलेच्या माध्यमातून समाजमनावर संस्कार घडवण्याचे काम आणि त्यातून थोर मानवी मूल्यांचे संवर्धन करणारा समाज घडवण्याचे काम ‘संस्कार भारती’ करत आहे. ‘संस्कार भारती’ कलांचे शिक्षण देणारी शिक्षण संस्था नाही. तसेच मनो
रंजनाचे कार्यक्रम करून अर्थोत्पादन करणारी संस्थाही नाही. ‘संस्कार भारती’चा मुख्य उद्देश कलेच्या माध्यमातून समाजातील व्यक्ती व्यक्ती संस्कारीत करणे, संस्कारक्षम व्यक्तींचा चारित्र्यसंपन्न समाज घडवणे व त्यातून शक्तिशाली, वैभवसंपन्न राष्ट्र घडवणे.

‘संस्कार भारती’ची स्थापना 11 जानेवारी 1981 रोजी लखनऊ येथे झाली. पद्मश्री डॉ. हरीभाऊ वाकणकर (जगद्विख्यात पुरातत्त्वज्ञ, नाणकशास्त्रज्ञ, पुराभिलेख तज्ज्ञ आणि कला शिक्षक) यांनी संस्थापक महामंत्री म्हणून काम पाहिले. ‘सा कला या विमुक्तये’ हे ‘संस्कार भारती’चे बोधवाक्य आहे आणि तेराव्या शतकात बांधल्या गेलेल्या प्रसिद्ध कोणार्कच्या सूर्यमंदिरातील रथाचे चाक हे बोधचिन्ह आहे. सर्व कलांची देवता म्हणून ज्याला मानतात, तो नटराज ‘संस्कार भारती’चे आराध्य दैवत, तर आद्य नाट्यशास्त्रकार भरतमुनी यांना गुरूस्थानी मानले आहे.

‘संस्कार भारती’चे रांगोळी रेखाटन (भू-अलंकरण) हे मनाला भावणारे, प्रसन्न करणारे सादरीकरण आहे. अनेकांनी एकत्र येऊन योजनापूर्वक रांगोळी काढल्याने एक टीमवर्क उभे राहते. रांगोळीसोबत चित्रकला, साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य या कला विषयांच्या माध्यमातून, समाजातील सर्व वर्गातील लोकांवर लोकशिक्षणाद्वारे निरनिराळ्या ललित कलांच्या माध्यमातून संस्कार करून राष्ट्रीय भावनेची जागृती आणि राष्ट्रीय भावात्मक एकता वाढीस लागते.

या उद्दिष्टपूर्तीसाठी विविध उपक्रम हाती घेतले जातात. ते खालीलप्रमाणे :
ा आपल्या समिती क्षेत्रातील व्यावसायिक व नवोदित कलाकारांचा शोध घेऊन त्यांना एका
व्यासपीठावर आणणे. विषयवार सूची तयार करणे.
ा चित्र प्रदर्शन, स्लाईड शो आणि स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करणे.
ा व्याख्यानमाला, कीर्तन, भजन, कथाकथनाचे कार्यक्रम घडवून आणणे.
ा लोकशिक्षणार्थ लोककलांची कार्यशाळा आयोजित करणे.
ा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संघटित करून समाजप्रबोधनासाठी पथनाट्यांचे आयोजन करणे.
ा ज्येष्ठ कलाकारांकडून नवोदित कलाकारांना त्या त्या कलेविषयी मार्गदर्शनपर अभ्यासवर्गांचे आयोजन करणे.
ा कला क्षेत्रातील विस्कळीतपणा, आपपर भाव दूर करून निकोप आनंदाचे साधन म्हणून लोकांनी पाहावे यासाठी प्रयत्न करणे.
ा पारंपारिक आणि आधुनिक कलांचे संशोधन-संवर्धनात्मक अभ्यास करणे व प्रसार करणे.
ा कला सादरीकरणाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर समाजातील सर्व थरातील जाती, पंथ, धर्म भेदभाव दूर ठेवून आपण या समाजाचे घटक आहोत, देशाचे नागरीक आहोत, राष्ट्राचे पायीक आहोत, ही राष्ट्रीय भावना जागृत करणे व देशाची भावात्मक एकता वाढीस लावणे.

गोरेगाव समिती

दिनांक 7 ते 9 नोव्हेंबर 1997 या काळात संभाजी नगर येथे ‘संस्कार भारती-महाराष्ट्र प्रांता’चा तृतीय ‘कला साधक संगम’ संपन्न झाला. गोरेगावातील काही कलाकार व रसिक या संगमाला गेले होते. ‘कला साधक संगम’च्या मंचावर अभिरूची संपन्न संगीत, नृत्य, नाट्य, गायन, चित्रकला यांचे सादरीकरण व मुख्य म्हणजे विविध रंगांच्या भव्य रांगोळ्या हे त्या कार्यक्रमाचे आकर्षण होते. हे सर्व पाहून ऐकून गोरेगावातून उपस्थित राहिलेल्या कलाकारांनी आपणही गोरेगावात ‘संस्कार भारती’चे काम सुरू करायचे असे निश्चित केले. भरतमुनी जयंतीच्या दिवशी, 21 फेब्रुवारी 1998 रोजी संवादिनीवादक पंडीत चिमोटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराजपूजनाने ‘संस्कार भारती-गोरेगाव समिती’ची औपचारिक स्थापना झाली.

पांडुरंगवाडी मसुराश्रम येथे 24 मे 1998 रोजी पहिला रांगोळी प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. गोरेगाव समितीने आयोजित केलेल्या या पहिल्या शिबिरात 75 महिला व पाच पुरुष सहभागी झाले. या शिबिरानंतर सन्मित्र मंडळ विद्यामंदिर येथे साप्ताहिक रांगोळी प्रशिक्षण वर्ग नियमितपणे सुरू झाले व आजपर्यंत सुरू आहेत. आजपर्यंत या वर्गांतून 1 हजारहून अधिक महिलांनी व पुरुषांनी रांगोळी रेखाटनाची कला आत्मसात केली आहे. या वर्गांमुळे अनेक कार्यकर्ते ‘संस्कार भारती’शी जोडले गेले व त्यांच्या जोरावर समितीने अनेक लहान-मोठे उपक्रम-कार्यक्रम गेल्या काही वर्षांत यशस्वीपणे राबवले आहेत.

‘संस्कार भारती-गोरेगाव समिती’ने मोठे कार्यक्रम केले त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा असे कार्यक्रम म्हणजे, ‘वेद मंत्राहून वंदनीय वंदे मातरम्’ हा राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, ग.दि. माडगुळकररचित संपूर्ण ‘गीतरामायणा’चे सादरीकरण, स्व. सुधीर फडके यांना आदरांजली वाहणारा ‘ज्योतीने तेजाची आरती’ हा कार्यक्रम, पु.ल. देशपांडेंच्या ‘वार्‍यावरची वरात’ तसेच ‘नारायण’चे सादरीकरण, रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांची प्रकट मुलाखत, स्वा. सावरकरलिखित ‘1857 चे स्वातंत्र्यसमर’चे नाट्यरूपांतर, ‘स्वरप्रभात पहाट राग’ असे अनेक प्रासंगित, तसेच मासिक कार्यक्रम आहेत. शिवाय रामनवमी, गुरुपौर्णिमा, कृष्ण जन्माष्टमी, दिवाळी परिवार मेळावा, प्रजासत्ताक दिन व भरत मुनी जयंती हे सहा अनिवार्य कार्यक्रम घेतले जातात.


अशा अनेक उपक्रमांतून ‘संस्कार भारती’ समाजमनावर समाजसंघटनेचा संस्कार घडवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असते.

- अरविंद जोशी
(लेखक बरेच वर्ष ‘संस्कार भारती-गोरेगाव समिती’चे कार्यवाह होते
व सध्या पश्चिम मुंबई विभागाचे प्रमुख आहेत.)
99691 96626

मेजवानी










कलिंगडाचे लाडू (डेझर्ट)
साहित्य - 1 तुकडा कलिंगड, पाव किलो पनीर, 100 ग्रॅम पिठीसाखर, 4 स्पाईस पाव, 1 मोठा चमचा दूध
कृती - पनीर किसून घेणे
. त्यात कमी-जास्त प्रमाणात चवीनुसार पिठीसाखर घालणे.
त्यात पावाच्या कडा काढून दूधात भिजवून पनीर व पिठीसाखरेमध्ये टाकणे. हे मिश्रण चांगले मळून घेणे. ते हातावर थापून त्यात कलिंगडाचा लाडुच्या आकाराचा गोल तुकडा ठेवणे व लाडू आकारात वळून फ्रिजमध्ये ठेवणे. डेझर्ट म्हणून हा अतिशय चांगला व करायला सोपा असा अनोळखी पदार्थ आहे. यात कलिंगडाशिवाय इतर कोणतेही फळ वापरून लाडू बनवू शकता. या सामुग्रीपासून 15-16 लाडू बनतात.

गव्हाच्या पिठाची कॅडबरी
साहित्य - 3 वा
ट्या गव्हाचे पीठ, 1 वाटी कोक पावडर, 3 वाट्या साखर, 1 वाटी लोणी, अर्धा वाटी काजू-पिस्ता-
विरघबेदाणे, 1 कप मिल्क पावडर

कृती - गव्हाचे पीठ, कोक पावडर व मिल्क पावडर एकत्र चाळून घेणे. एका कढईत अर्धा कप पाणी घेऊन त्यात साखर घालून गॅसवर ठेवणे. एक उकळी येऊन साखर ळल्यानंतर त्यात लोणी घालणे व त्यालाही एक उकळी काढणे. यात काजू, पिस्ता, बदाम, बेदाणे, चाळलेले पीठ हळूहळू एकत्र करणे. त्याचा घट्ट गोळा होत आला की कॅडबरीच्या साच्यात तूप लावून त्यात हे मिश्रण ओतणे. चांगले 5-6 तास झाले की डब्यात ठेवून हवे तेव्हा चवीने खाणे. थंड नसलेली, पण पौष्टिक अशी ही कॅडबरी मुलांना द्यायला मातांना फार आवडेल.
बोराचे घरगुती चॉकलेट्स

साहित्य - अर्धा किलो जळगावची मोठी बोरे, दीड वाटी साखर, अर्धा वाटी चॉकलेट किंवा कोको पावडर, अर्धा वाी मिल्क पावडर, पाव वाटी लोणी, काजू, बदाम, पिस्ता, वेलची पावडर.

कृती - प्रथम बोरे स्वच्छ धुवून घ्या. त्याचा किस करून तो कडकडीत उन्हात वाळवा. म्हणजे तो कुरकुरीत झाला पाहिजे. किसाचे मिक्सरवर बारीक कुट करा. चाळणीने चाळून घ्या. अर्धी वाटी बोरकुट एका कढईत घेऊन त्यात साखर, कोको पावडर, मिल्क पावडर, लोणी मिसळून गॅसवर ठेवा. सुरुवातीला गॅस मोठा ठेवा. मिश्रणाला थोडे पाणी सुटायला लागले की गॅस कमी-जास्त करायला हरकत नाही. मिश्रण सारखे हलवत राहा. मिश्रण थोडे घट्ट झाले की त्यात काजू, बदाम, पिस्ता, वेलची पावडर घालून सारखे करून एका पसरट छोट्या ताटात व चॉकलेट मोल्डमध्ये तुपाचा हात फिरवून गरम असतानाच ओता आणि पसरावा. थर मध्यम असू द्या. मश्रिण थोडे कोमट झाल्यावर फ्रिजमध्ये तासभर ठेवा व खायला द्या.

केळफुलाचा मेदूवडा
साहित्य - 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी शिजवलेली केळफुलाची भाजी, मिरची, आल, लसूण, कोथिंबीर, कडिपत्ता 1 मोठा चम
चा, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, हळद, तिखट, चवीनुसार मीठ, तळायला तेल, खोबर्‍याचे बारीक तुकडे.

कृती - उडीद डाळ चार तास भिजवून ठेवणे. नंतर ते बारीक वड्याच्या पीठासारखे वाटून घेणे. त्यात शिजवलेली केळफुलाची भाजी, बारीक मिरची, कोथिंबीर, खोबर्‍याचे बारीक तुकडे, गरम मसाला, मिरची पावडर, हळद सगळे मिश्रण करून मेदूवड्याचा आकार देऊन तळून घेणे व खोबर्‍याची चटणी व सांबर बरोबर सर्व्ह करणे.

टिप्स - केळफुलाचा वा
पर रोजच्या खाण्यात कमी असतो. वड्याच्या निमित्ताने केळफुलाची चव चाखली जाईल.

बांगडा पॅटीस

साहित्य - बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा मिरची, 1 मोठा चमचा आले-लसूण पेस्ट, 1 अंडे, 2 बारीक चिरलेले कांदे, 100 ग्रॅम
ब्रेड्युम्प पावडर, चिमुटभर मीठ, धुवून स्वच्छ केलेले दोन बांगडे मासे.

कृती - प्रथम गॅसवर दोन कप पाणी ठेवून त्यात धुवून स्वच्छ केलेला बांगडा घालावा. 5 मिनिटे उकळू द्यावे. त्यानंतर पाणी काढून टाकून बांगडा मास्याचे
काटे साफ करून घ्यावे. त्यात कापलेली मिरची, कोथिंबीर, आले-लसूण पेस्ट,
बारीक चिरलेला कांदा, हळद, मीठ घालून चांगले मळून घ्यावे. त्याला पॅटीसचा आकार देऊन अंड्याच्या बलकामध्ये बुडवून काढावे व ब्रेड्युम्प पावडर लावून तव्यावर शॅलो फ्राय करावे. गरमा-गरम चटणीसोबत खावयास द्यावे.

टीप्स - बांगडा म्हटले की नाक मुरडणार्‍या मुलांसाठी हा एक वेगळ्या प्रकारचा पदार्थ बनू शकतो. खूप खर्च करून वाटाणा किंवा खिमा पॅटीस करण्यापेक्षा कमी खर्चात घरच्याघरी पॅटीस बनवून लोकांची वाह वा मिळवता येते.

मशरूम-कॉर्न पिकल (लोणचे)

साहित्य - 200 ग्रॅम मशरूम, 100 ग्रॅम कॉर्न, चार हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 2 चमचे आले व लसणाचे लहान लहान तुकडे, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा तेल, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे
लिंबाचा रस.

कृती - मक्याचे दाणे वाफवून घ्यावेत. मशरूमचे मध्यम तुकडे करून चिरून घ्यावेत. कढईत तेल वाफवून घेणे व त्यात आले, लसूण, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर हे
सर्व मिश्रण गुलाबी रंगात परतून घेणे. त्यात मशरूम, मक्याचे दाणे घालून एक वाफ काढून घेणे. त्यात मिरची पावडर, हळद, मीठ घालून परतून घ्यावे. शेवटी लिंबाचा रस घालावा. तयार झाले चमचमीत लोणचे.

टीप्स - हे लोणचे 8 ते 10 दिवस सहज टिकते. घरीच नव्हे तर प्रवासातसुद्धा उपयोगी येते.

न्युट्रीशिअस सोया थालीपीठ

साहित्य - OATS 200 ग्रॅम, 100 ग्रॅम सोयापीठ, 100 ग्रॅम नाचणी पीठ, 50 ग्रॅम भाजणी पीठ, 100 ग्रॅम मोड आलेली मटकी
व मूग, 1 मोठा चिरलेला कांदा तसेच बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर, मीठ, शॅलो फ्राय करण्यात
तेल.

कृती - प्रथम मूग-मटकी एक वाफ काढून घ्यावे. वरील इतर साहित्य व वाफ काढलेली मूग व मटकी एकत्र करून नॉन स्टिकच्या त
व्यावर कमी तेलात थालीपीठ थापावे. ही थालीपीठे ओव्हनमध्येसुद्धा चांगली होतात.

टीप्स - अतिशय न्युट्रीशस व डायेटेबल थालीपीठ आहे. यात बीट, गाजर वापरून मुलांना डबा म्हणून देऊ शकता. तसेच डायेटसाठीही उपयुक्त आहे.

- वीणा प्रभु


ईष्टापत्ती


‘‘साहेब, जरा गाडी बाजूला घेता का? मला गाडी काढायची आहे.’’
अनेक वर्षांपूर्वी ऐकलेल्या ओळखीच्या आवाजामुळे मी चमकून मागे पाहिले. माझा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना. जवळजवळ पंचवीस वर्षांनी आमची भेट होत होती. तीही अचानक आणि अनपेक्षितपणे. अचानक कशाने कंपनी बंद पडल्याने आणि घरच्या परिस्थितीमु
ळे गावी परत जावे लागल्यामुळे सदा सरवदेची परत कधी भेट होईल, असे कधीच वाटले नव्हते. अनपेक्षित अशा कारणाने की इतक्या वर्षांनी तो अशा रूबाबात भेटेल, अशी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. कदाचित त्यानेही कधी केली नसेल. त्यामुळेच एकमेकांना भेटल्यावर आम्ही दोघेही इतके आश्चर्यचकित झालो की पहिल्यांदा कोणी, कोणाशी, कसं आणि नक्की काय बोलायचं. म्हणूनच एकमेकांना भेटल्यावर आम्हा दोघांनाही सूचत नव्हतं.
‘‘सर, आपण समोरच्या हॉटेलात चहा घेऊया का? प्लीज नाही म्हणून नका.’’
‘‘अरे वेडा आहेस का? मी नाही कशाला म्हणेन? पण एका अटीवर, बील मी देणार.’’
‘‘साहेब, तो नंतरचा प्रश्‍न आहे. आधी चला तर!’’
पूर्वी इतकंच बोलणारा सदा चालतानाही अंतर ठेवूनच माझ्या पाठोपाठ हॉटेलात शिरला. एका छोट्या टेबलाजवळ आम्ही समोरासमोर बसलो. जराही वेळ न घालवता आणि मुख्य म्हणजे मला न विचारता आणि परवानगी गृहीत धरूनच वेटरला त्याने स्पेशल चहा आणि कांदा भज्यांची ऑर्डर दिली.
‘‘बोल सदा, अरे हे झकपक कपडे, गाडी, काही सांगशील की नाही?’’ इतक्या वेळानंतर माझ्या चेहर्‍यावरचे आश्चर्य जरा कमी झालं असलं तरी उत्सुकता तशीच होती. इतक्या वर्षांनंतर सदा सरवणेमधला अमुलाग्र बदल मी अजूनही समजावून घेण्याचा प्रयत्न करत होतो.
‘‘सांगतो साहेब, म्हणून तर त्रास दिला तुम्हाला थांबण्याचा.’’
‘‘अरे त्रास कसला त्यात? बोल लवकर.’’
‘‘साहेब तुम्हाला आठवतच असेल की आपली कंपनी बंद पडली तेव्हा तुमच्यात हाताखाली तुमची सगळी कामं करत होतो. अगदी तुमचं केबिन नीटनेटकं ठेवण्यापासून ते दर दहा तारखेला बँकेमधून तुमचा पगार काढून आणण्यापर्यंत. पगार काढून आणला रे आणला की आपल्या डिपार्टमेंटसाठी दर महिन्याला न चुकता तुम्ही स्पेशल चहा आणि गरम गरम भजी मागवत होतात. ती ऑर्डरची मीच द्यायचो.’’
आता माझ्या लक्षात आलं की सदाने इतकी झटपट आणि बरोबर ऑर्डर कशी दिली ते. सदा सरवदे त्यावेळी नोकरीच्या शोधात सोलापूरजवळच्या बार्शीहून थेट पुण्याला आला. शिक्षण जेमतेम पाचवी-सहावीपर्यंत झालं असेल-नसेल. पण वागण्या-बोलण्यात अतिशय अदब आणि नम्रता होती. पांढरा स्वच्छ लेंगा आणि शर्ट डोक्यावर पांढरी टोपी अशा अगदी साध्या पोशाखातूनही त्याची स्वच्छता आणि टापटीपपणा जाणवत होता. केव्हाही आणि काहीही काम सांगा झटपट आशि व्यवस्थितपणे करून पुन्हा हसतमुखाने समोर हजर व्हायचा जणू काही त्याने शिकलेल्या चार बुकात आराम आणि आळस हे शब्दच लिहिलेले नव्हते.

‘‘हं बोला सदाभाऊ’’ मी म्हणालो.
‘‘साहेब कृपा करून मला अहोजाहो करू नका. मला अवघडल्यासारखं होतं. तुमच्यासाठी पूर्वीचा सदाच राहू दे.’’
पूर्वीच्या कंपनीमधला पांढर्‍या युनिफॉर्ममधला सदा आणि आता माझ्यासमोर पांढर्‍या सफारीमधला सदा यांच्यामध्ये तिळमात्र फरक नव्हता. नाही म्हणायला सायकलच्या जागी कार तीही पांढरी-स्वच्छच! सदा जणू
मला सूचवत होता की देश आणि वेष बदलला तरी स्वभाव बदलत नाही.
‘‘साहेब तुमच्या लक्षात असेलच की आपल्या कंपनीत लागलो तेव्हा मी एकटाच पुण्यात राहत होतो. आई, वडील बार्शीला होते. वडील आमची छोटीशी शेती सांभाळून वैरागच्या साखरकारखान्यात गळीपाच्या हंगामात कामही करायचे. पण आपली कंपनी बंद पडायला आणि वडील जायला एकच गाठ पडली. तुमच्यासारख्यांना लगेच दुसरी नोकरी मिळाली असणारच. मला माहीत आहे कदाचित तुम्ही मला तुमच्या नव्या कंपनीत नोकरीला ठेवून घेतलं असतं, पण माझी आई गावाकडची ‘काळी आई’ सोडायला काही केल्या तयार होईना. वडील व नोकरी दोन्ही गमावले. म्हणतात ना की संकटं येतात तेव्हा हात धुवूनच येतात. पण त्याही परिस्थितीत जरा मन आणि डोकं शांत ठेवून विचार केला की संकटाकडे जर संधी म्हणून पाहिलं तर? कोणी सांगावं पांडुरंगाच्या मनात काही वेगळं नसेल कशावरून?’’

मी सदाकडे थक्क होऊन पाहत होतो. त्यावेळचा पंचवीशीतला सदा जीवनाबद्दल इतकं साध तत्त्वज्ञान कोठे बरं शिकला असेल? मला वाटतं गरिबीचं माणसाला घडवण्याचं काम करते.
‘‘सदा, पुढे काय झालं ते सांगशील का?’’ साहजिकच माझी उत्सूकता आता आणखीनच वाढली होती.
‘‘साहेब आपण भजी आणि चहा परत मागवूया का?’’
‘‘ठीक आहे.’’
‘‘तर मी काय सांगत होतो? दोन-चार वर्षं कशीबशी ठीक गेली, पण तेवढ्यात आईच्या आग्रहाखातर लग्न करावं लागलं आणि पुढच्या दोन-चार वर्षांत खाणारी आणखी दोन तोंडं वाढली. मग काय सांगू साहेब? आधीच सोलापूर दुष्काळी जिल्हा माझ्या मगदुराप्रमाणे शेतीत थोडीफार सुधारणा करतच होतो. त्यामध्ये गाठीशी पैसे संपत आले. हळूहळू कर्जाचा बोजाही वाढत चालला आणि वययुद्धा कमाई चार आणे आणि खर्चाचा बंदा रुपया. नोकरीचे दोर अपुर्‍या शिक्षणाने व वाढत्या वयाने केव्हाच कापले गेले होते. आता धड ना शेती ना नोकरी. नो तळ्यात ना मळ्यात. काही सुधरेना बघा.
अशातच हताश होऊन शेतावरून घराकडे यायला निघालो. फार थकवा आला म्हणून घोटभर चहा घ्यावा म्हटलं तर जवळपास येकपण टपरी दिसेना. तेवढ्यात सोलापूर-बार्शी सुपरफास्ट एस्टी बाजून निघून गेली आणि साहेब विठ्ठलाची शप्पथ सांगतो रणरणत्या वैशाखाच्या उन्हातही डोक्यात वीज चमकून गेली.

म्हटलं आपल्या नेमका पाहिजे तेव्हा कपभर चहा मिळेना आणि इथं तर दिवसाकाठी पन्नास एक एस्ट्या, शेकड्यांनी बैलगाड्या आणि पायी चालणारी माणसं जातात. त्यांना जर चहा प्यावासा वाटला तर काय करत असतील? साहेब, चक्क दुसर्‍या दिवशी घराकडून चहाच्या टपरीसाठी लागणारं सामान-सुमान आणलं. माऊलीच्या फोटोला हार घातला आणि केली की सुरवात. रोजच्या सुरवातीच्या पन्नास कपांचे बघता-बघता शंभर-दीडशे कप झाले. म्हणतातना चहाची वेळ झाली की माणसाला फक्त चहाच लागतो, दुसरं काहीही चालत नाही. अगदी अमृतसुद्धा. म्हणूनच कदाचित चहाला पृथ्वीवरचं अमृत म्हणत नसतील?’’ सदा जसजसा बोलत होता तसतशी त्याची कहाणी आणखीनच ऐकावीशी वाटत होती.

‘‘मग काय चहाबरोबर गिर्‍हाईकांना खाण्यासाठी काही बाही ठेवायला, सुरुवातीला बटर, मग बटाटे वडे, वडापाव; चहाच्या टपरीचं छोटं हॉटेल झालं. मारुतीरायाच्या शेपटासारखा पसारा वाढायला लागला आणि गिर्‍हाईकसुद्धा. पण मराठी असूनही आपण एक गोष्ट ठरवली. गिर्‍हाईक जोडायची, तोडायचं नाही. त्यासाठी जिभेवर साखर ठेवायची आणि डोक्यावर बर्फ. बाकी विठ्ठलाच्या हाती!

मग काय विचारता? हॉटेलाचाही पसारा हळूहळू वाढायला लागला. बायका-मुलंही मग हॉटेलकडे बघायला लागली. मघाशी तुम्हाला सांगितलं तसं देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं एवढं नक्की! म्हणून तर त्या चोच देणार्‍याने चार्‍याचीही सोय करून ठेवलेली होती.’’ असं म्हणून सदाने बसल्या जागीच डोळे मिटून पंढरपूरच्या दिशेने नमस्कार केला. तो विठुरायाला नक्कीच पोहोचला असणार, कारण शेवटी ‘भाव तेथे देव!’
‘‘अरे पण गाडी वगैरेचं काय?’’ मी विचारलं.
‘‘त्याचं काय झालं साहेब, मी नाही म्हटलं तरी कमाई वाढत होती. पण आम्ही पिढीजात माळकरी अन् टाळकरी. त्यामुळे सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही. जेवणखाण म्हणाल तर साधंच, अगदी सणासुदीला गोड झालं तरच! त्यामुळे पैसाही बर्‍यापैकी गाठीला साठत गेला, बरं भाकरीला काय मोडाला तिकडून तोंड आणि येणार्‍या पैशाला काय जायला दहा वाटा - रावणाच्या तोंडासारख्या. साठवलेला पैसा कापरासारखा केव्हा उडून जाईल त्याचा नेम नाही. त्यातून हॉटेलच्या जोडीला म्हणून कॅटरिंग सुरू केलं, पुण्याकडचे व सोलापूरमधले दोन-चार हॉलही बांधून घेतले. हॉटेल व कॅटरिंगमध्ये मिळून शंभरेक माणसं पोटाला लागली. खर्‍या अर्थाने ‘अन्नदाता’ झालो.’’
हे सांगताना सदा त्याच्या सोनेरी चष्म्यातून अतिशय निरागसपणे हसला.

‘‘मग काय पैशाच्या दुथडी भरून वाहणार्‍या चंद्रभागेवर धरण बांधायचं ठरवलं, थोडा जमीन-जुमला घेतला, बायका-मुलांच्या नावाने दोन-चार राहायच्या जागा घेतल्या. आर्थिक स्थैर्याच्या पाठोपाठ सुबत्ता आली. मग मुलांच्या वाढत्या संसाराचीही चिंता राहिली नाही.
पण इतकं सगळ होऊनही एक शल्य मनाला स्वस्थ बसू देईना.’’
‘‘आता काय?’’ मलाही राहावेना.
‘‘अर्धवट शिक्षणामुळे आमच्या नशिबात खुरडणं आलं. तुमच्यासारख्या देवामाणसांच्यामुळे ते सुसह्य झालं ते ठीक. वेळच्या वेळी स्वत:ला सावरल्यामुळे मुलांनाही शिकवता आलं आणि तीही धंद्यात आली, पण नंतर लक्षात आलं की आजही आपल्याकडे अशी कितीतरी दुर्दैवी मुलं आहेत की जी हुशार असूनही केवळ घरच्या परिस्थितीमुळे ‘तुही यत्ता कंची?’ असा प्रश्‍न विचारायची वेळ त्यांच्या बाबतील अजूनही येते. मग माझ्या मनात विचार आला की आपण उपाशी राहून दुसर्‍याला जेवायला घालण्याइतके कदाचित आपण मोठे नसू, पण आपल्या ताटातलं चार घास दुसर्‍यासाठी काढून ठेवण्याइतकी ताकद, कुवत आणि दानत देवाने नक्की आपल्याला दिली आहे.’’ सदाच्या तत्त्वज्ञानाने मी भारावून गेलो.

‘‘म्हणून ठरवलं की अशा मुलांना शिकवायचं. सुरवातीला माझ्या हॉटेलात काम करणार्‍या मुलांना स्वखर्चाने शाळेत पाठवलं मग हळूहळू छोटीशी शाळा सुरू केली. गरजा वाढत वाढता शाळेसाठी कॉलेज काढलं. बघता बघता शिक्षणसंस्था उभी राहिली. आता तर इतकं समाधान वाटतंय की सांगायला व ते करून घेणार्‍या ‘पंढरीनिवासा’चे आभार मानायला शब्दच नाहीत.’’
इतका वेळ अखंड बोलणारा सदा गहिवरला आणि हळूहळू शांतही झाला. खिशातून परीटघडीचा रूमाल काढला व चष्मा काढून त्याने आनंदाश्रूंना वाट करून दिली.
मीही त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणालो, ‘‘अरे ज्ञानदानाच्या पवित्र कार्याला तुजा हातभार लागला. दानासाठी धनापेक्षा मनाची श्रीमंती लागते. तुझ्याकडे तर दोन्हीही आहे. मला तुझ्या भाग्याचा हेवा वाटतो.’’

सदाची कथा ऐकून माझे मन परत पंचवीस वर्षे मागे गेले. त्यावेळच्या व आताच्या सदामध्ये जमीन-अस्मानचा फरक होता. अगणित संकटे एकामागोमाग आली म्हणून गुडघ्यात मान घालून नशिबाला दोष देत रडत आणि कुढत बसला नाही. परिस्थितीला हतबल होऊन शरण जाण्याऐवजी स्वत:च्या सामर्थ्याने परिस्थितीचा प्रवाहच बदलला. मला कुसुमाग्रजांच्या ‘कोलंबसचे गर्वगीत’मधील ओळ आठवली, ‘अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् अशा, किनारा तुला पामराला’ खरोखरच जवळजवळ वर्षभर खवळलेल्या समुद्राशी झुंज देऊनही यश न आल्याने कोलंबसने अमेरिकेचा शोध थांबवला असता तर कोणी त्याला दोष दिला नसता, पण मग त्याचे नावही जगाच्या इतिहासात अजरामर झाले नसते.

शिपायापासून ते खर्‍या अर्थाने शिक्षणमहर्षी होणे म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखेच होते. क्षीतिजाचा पल्ला दृष्टिपथातही नसताना नियतीने जटायुसारखे पंख कापूनही त्यान गरूडझेप घेतली. म्हणतात ना आकाशात वादळाची चाहूल लागली की चिमणी, कावळे आपापल्या घराचा आसरा घेतात, पण पक्षीराज गरूड मात्र आपले पंख फैलावून सूर्यावरसुद्धा सावली धरायचा प्रयत्न करतो. सदा सरवदेने यापेक्षा वेगळे काय केले? वेगळे केलेच असेल तर इतकंच आकाशात झेपावूनही जमिनीवरची नजर काढली नाही. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून पूनर्जन्म घेऊनही त्याच राखेचा अंगारा करून तो रंजल्यागांजल्यांच्या कपाळी लावला. पण ‘मला साधू म्हणून ओळखा’ असा अट्टाहास सोडाच, साधा आग्रह किंवा अपेक्षाही केली नाही. स्वत:चा विकास करताना समाजाचेही ऋण फेडले. एका अर्धशिक्षित माणसाची शिक्षणसंस्था उभारण्यापर्यंत मजल गेली आणि ‘परोपदेशे पांडित्यात’ समाधान मानणार्‍या पुस्तकी पंडितांना काहीही न बोलता प्रत्यक्ष कृतीने त्याने आपली जागा दाखवून दिली.

आम्ही हॉटेलातून बाहेर पडलो. भररस्त्यात काहीही न बोलता सदाने माझ्या पायांना हात लावला आणि झटकन माझा हात खिशातल्या रूमलाकडे केव्हा गेला ते माझं मलाच कळलं नाही.

- मुकुन्द सराफ
अनिकेत सहनिवास,
विलेपार्ले (पू.) मुंबई - 400 057
भ्रमणध्वनी : 99672 75375

एकाकी वैभव


दो दिल मिल रहे है...
मगर चुपके चुपके....

शाहरुख खानच्या तोंडी हे सुंदर गाणं, महिमा चौधरीची शालीन अदा, फिल्म परदेसचं हे गीत. आठवलं ना? एकदम रोमँटिक मूडमध्ये नेणार; एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारं. या गाण्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते जिथं शुट केलंय ते ठिकाण फतेहपूर सिक्री! लाल दगडातल्या भव्य इमारती आणि महाल, नक्षीदार कमानी, जाळीदार खिडक्या भिंतीवरची लाजवाब चित्रसंपदा, साध्या-सुंदर मशिदी, श्वेतवर्णी दर्गा आणि झाडांची अधूनमधून दिसणारी हिरवाई! परदेसंच हे गाणं हिट होण्यात या फतेहपूर सिक्रीचा, इथल्या जादूई परिसराचाही मोलाचा वाटा आहे.

ताजमहालाच्या तुलनेत दुर्लक्षित राहिलेल्या या शहराचं वर्णन करताना अनेकजण त्याला ‘जगातील सगळ्यात अलौकिक भुतिया वाडा’ (Ghost citiy), ‘ओसाडबाग’ असं वर्णन करतात. असं बिरुद लावतात. आग्रा तालुक्यातलं हे छोटंसं गाव, आजही फारसं गजबजलेलं नाही. आग्राहून 37 किमी दूर पश्चिम दिशेला, 400 वर्षांपूर्वी वसवलेलं हे शहर. तिसरा मोगल बादशहा मोहम्मद जलालुद्दीन अकबर याने सिक्रीच्या ओसाड माळरानावर एक संपूर्णपणे नवीन विचार आणि आयाम असलेलं शहर वसवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. तेव्हा उभारलं गेलं ते फतेहपूर सिक्री-फतेह अर्थात विजयाचं शहर! हे शहर पाहताना तुम्हाला त्यांच्या सौंदर्यग्रह
णासाठी डोळ्यांचा जास्त प्रमाणात वापर करावा लागतो.

सिक्रीचा इतिहास-अकबराच्या पूर्वीचा

फतेहपूर सिक्रीची निर्मिती जरी अकबराने केली तरीही सिक्रीचा इतिहास अकबराच्या अगोदरचा आहे. सिक्री हे बाराव्या शतकापासून ‘सिकरवार राजपुतांच्या’ अधिपत्याखाली होतं आणि सिकरवारांवरून या ठिकाणाला सिक्री हे नाव पडलं. नंतर आलेल्या तुर्की आणि मोगल बादशहांना आणि सरदारांना सिक्रीचं हे पठार मोहिमेच्या आधी सैन्य गोळा करणर्‍यांसाठी आणि त्यांच्या छावण्यांसाठी योग्य वाटलं.
तसंच अकबर काही पहिला मोगल बादशहा नव्हे, ज्याचं लक्ष सिक्रीकडे गेलं. मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर यानेदखील सैन्यासाठीच सिक्रीला हेरून ठेवलं होतं, शिवाय बाबराने जवळच्याच एका नदीच्या प्रवाहावर बांध घालण्याचं काम सुरू करण्याचे आदेश दिले. जेणे करून तिथे एक तळं निर्माण होईल आणि सिक्रीची पाणीपुरवठ्याची गरज भागेल. उतारांवर बगीचेही लावण्याची सोय केली. हे सगळं मनुष्यवस्तीसाठी सिक्री अधिक सोयीची ठरावी म्हणून बाबरचा हा दूरदर्शीपणा पुढे वरदान ठरला.

कहाणी जोधा-अकबरची

1568 पर्यंत अकबर भारतातील सर्वांत मोठा सम्राट बनला होता आणि त्याची कीर्ती आणि दबदबा सर्वदूर पसरला होता; मात्र त्याने उभारलेलं एवढं मोठं साम्राज्य स्वत:नंतर सांभाळण्यासाठी त्याला मुलं आणि गादीला वारस नव्हता. अनेक पवित्र धामांना, तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन, दानं देऊन झालं, अनेक साधू-संत, मौलवी यांचे आशीर्वाद झाले, पण काही गुण आला नाही. शेवटी असंच सिक्रीच्या शेख सलीमउद्दीन चिस्ती, या सुफी संतांची कीर्ती अकबर बादशहाला सिक्रीपर्यंत रणरणत्या उन्हातून, तप्त वाळवंटातून अनवाणी खेचून घेऊन आली.

शेख सलीमउद्दीन चिस्ती यांनी अकबराला आशीर्वाद दिला की तुला तीन मुलं होतील आणि काही महिन्यातच हे भाकीत खरं ठरलं. अकबराची पहिली बायको जोधाबाई हिने एका मुलाला जन्म दिला आणि शेख चिस्तींचा आशीर्वाद खरा ठरला. म्हणून या नवजात मुलाचं नाव ठेवलं गेलं सलीम! (हाच पुढे जहांगीर म्हणून ओळखला गेला) पुढे आणखी काही महिन्यांतच अकबराच्या अजून दोघा बायकांनी गोड बातमी दिली आणि दोघींनाही मुलगे झाले.

पुत्रांच्या जन्माच्या आनंदात हरखून गेलेल्या बादशहा अकबराने निश्चय केला की सिक्रीच होईल त्याच्या साम्राज्याची नवी राजधानी! मात्र इतिहासकारांच्या मते, वारस मिळण्याचा आनंद हे फतेहपूर वसवण्यामागचं एकमेव कारण नसावं, तर ही नवी राजधानी मोगल साम्राज्याचं राजनैतिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्र बनू शकलं असतं, कारण फतेहपूर सिक्री अशा ठिकाणी होतं की ते मोगलांची राजकीय राजधानी आग्रा आणि कौटुंबिक श्रद्धास्थान असलेलं अजमेर (मोईनुद्दीन चिस्ती यांचा दर्गा) या दोघांत दुवा साधू शकलं असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक नवं शहर, नवी राजधानी बादशहाची सत्ता केंद्रीत करण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची ठरू शकली असती.

मूर्तिमंत अलौकिक वास्तुशिल्पकला

फतेहपूर सिक्रीत हिंदू-मुस्लीम स्थापत्त्यकला एकत्र नांदतात. फतेहपूर सिक्रीत हिंदू-मुस्लीम वा
स्तुकला समरस होऊन गेल्या आहेत. फतेहपूर सिक्रीचं नाव काढलं की डोळ्यांसमोर सर्वप्रथम येथं ते जामा मशीद, शेख सलीमउद्दीन चिस्तीचा दर्गा आणि बुलंद दरवाजा.

फतेहपूर सिक्रीत सर्वप्रथम कुठली इमारत बांधली गेली असेल, तर ती म्हणजे जामा मशीद. पूर्वेकडून बादशाही दरवाजातून आत आल्यावर मध्यभागी भव्य मोकळा परिसर आणि चारही बाजूंनी मोकळ्या खोल्या. कमानी आहेत. जिथे चिस्ती आपल्या अनुयायींना शिकवत असत. मधल्या मोकळ्या परिसरातच शेख सलीमउद्दीन चिस्ती यांचा दर्गा आणि नवाब इस्लाम खान यांची कबर आहे.

संपूर्णपणे लाल दगडात उभारलेल्या फतेहपूरमध्ये शेख सल्लीमउद्दीन चिस्तींचा दर्गा ही एकमेव श्वेतवर्णी संगमरवरी दगडातील वास्तू आहे. जहांगीर बादशहाचं या वास्तुला खरी शोभा आणली आहे. ती चारी बाजूला महीरपी संगमरवरी जाळीमुळे दूरदूरहून लोक दर्ग्यात येतात. दर्ग्याच्या संगमरवरी जाळ्यांना लाल भगवे धागे बांधतात, अशा दृढ श्रद्धेने की सलीमउद्दीन चिस्तींच्या आशीर्वादाने तेदेखील निपुत्रिक, राहणार नाहीत. दर्ग्यातील अंतर्गत नक्षीकाम, संगमरवरी जाळ्या; स्तंभ हे केवळ अप्रतिम! संगमरवरी जाळ्यांमुळे प्रकाशाचे होणारे परावर्तन पाहून डोळ्यांचे पारणे
फिटते.

जामा मशिदीचं बांधकाम पूर्ण झाल्यावर काही वर्षांनीच बादशहा अकबराने रणथंबोरचा महाकाय गड काबीज केला आणि या विजयाचा प्रतिक म्हणून फतेहपूर सिक्रीला ‘बुलंद दरवाजा’ बांधला. बुलंद दरवाजा जणू अकबराचं प्रतिदर्शन घडवितो. जवळजवळ 50 फूट रुंद आणि 100 फूट उंच हा दरवाजा एका मजबूत आणि भव्य पायथ्यावर उभारलाय, जो जमिनीपासून 42 फूट उंचीवर आहे. दरवाजावर बसवलेल्या संगमरवरावर कुराणातील अनेक कलमं कोरली आहेत. दरवाजाच्या चौकटीवर आपल्याला तांबड्या आणि पांढर्‍या रंगाच्या संगमरवर दगडाचे मिश्र बांधकाम दिसेल! या वास्तुचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या वास्तुंची प्रमाणबद्धता व डौलदारपणा असा हा भव्यदिव्य ‘बुलंद दरवाजा’ मैलोन् मैल दूरदेखील अकबर बादशहाच्या बुलंद साम्राज्याचं प्रतिक बनून चमकत राहतो.

खरं सांगायचं तर इथली प्रत्येक वास्तू, प्रत्येक इमारत हिचं स्वत:चं वेगळेपण आणि सौंदर्य आहे. ‘दिवाण-ए-खास’ पाहून तर प्रेक्षक स्तंभित होतात. बाहेरून दुमजली दिसणारी ही वास्तू आतून एकमजलीच आहे. ‘दिवाण-ए-खास’मधील मध्यभागी उभा असलेला खांब सुरुवातीला चौकोन, मध्यभागी अष्टकोन व वर बहारदार शिल्पकृतीने भरलेला असून त्याच्या वर असलेल्या बैठकीला पेलून धरतो. त्या बैठकीपर्यंत जाण्यासाठी तीन बाजूंनी फरसबंदी असलेले कठडे आहेत. इतिहासकार म्हणतात त्याचा उपयोग अकबर सल्लामसलत करण्यासाठी करत असे. तर काही इतिहासकारांच्या मते तिथे तो आपला खजिना ठेवत असे. इथल्या ‘दिवाण-ए-खास’मधील गोलाकार वेदी आणि भव्य, पण अत्यंत कुशल कलाकुसर असलेला स्तंभ डोळ्यांचं पारणं फेडतात.

फतेहपूर सिक्रीचा अस्त!

एवढं अलौकिक शहर, एवढे कष्ट करून बांधलेलं अमाप पैसा खर्च करून उभारलेला, पण उभारल्यावर पंधरा वर्षांतच संपूर्ण दरबार, सर्व माणसं, सारे व्यापार-धंदे, सगळ्यांनी गाशा गुंडाळला आणि निघून गेले.
कुणी म्हणतं तळं आटलं आणि पाण्याची कमतरता भासू लागली म्हणून; तर कुणी म्हणतं आग्रा आणि सिक्री इथे दोन्हीकडे व्यवहार सांभाळणं कठीण गेलं म्हणून; तर कुणी म्हणतं उत्तरेकडून होणारी आक्रमणं रोखण्याकरिता बादशहाने तळ हलवला. अनेक कारणं दिली जातात, पण खरं काय ते इतिहासालाच ठाऊक.

चंद्रेच्या कलेप्रमाणे फतेहपूर सिक्रीच्या वैभवाने पौर्णिमा गाठली. पण त्याच चंद्रेच्या कलेप्रमाणे याच सिक्रीच्या वैभवाला ओहोटी लागून अमावस्या गाठली. आज मात्र तिथले सोनेरी नक्षीकाम ओसरलं, रंगीत चित्र धुसर झाली आहेत. इमारतींची पडझड झाली, तलाव आटलाय, गुलाबं, सुकली आहेत आणि मागे राहिलंय ती अकबराची औट घटकेची राजधानी फक्त लाल दगडातलं चिरेंबदी पण एकाकी वैभव!

- श्वेता सावंत (B.A. in History)
सी-702, सोनी पॅराडाईज को-ऑप., टी.व्ही.एस.-घ्घ्घ्
वजिरा नाका, बोरिवली (प.), मुंबई - 400 091.
भ्र. 99694 93873

- नितेश राव (B.A. in History)
आरे कॉलनी, युनिट नं 31,
माळी नगर, गोरेगाव (पू.), मुंबई - 400 065
भ्र. : 99670 83129

एकाकी वैभव

दो दिल मिल रहे है...
मगर चुपके चुपके....

शाहरुख खानच्या तोंडी हे सुंदर गाणं, महिमा चौधरीची शालीन अदा, फिल्म परदेसचं हे गीत. आठवलं ना? एकदम रोमँटिक मूडमध्ये नेणार; एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारं. या गाण्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते जिथं शुट केलंय ते ठिकाण फतेहपूर सिक्री! लाल दगडातल्या भव्य इमारती आणि महाल, नक्षीदार कमानी, जाळीदार खिडक्या भिंतीवरची लाजवाब चित्रसंपदा, साध्या-सुंदर मशिदी, श्वेतवर्णी दर्गा आणि झाडांची अधूनमधून दिसणारी हिरवाई! परदेसंच हे गाणं हिट होण्यात या फतेहपूर सिक्रीचा, इथल्या जादूई परिसराचाही मोलाचा वाटा आहे.

ताजमहालाच्या तुलनेत दुर्लक्षित राहिलेल्या या शहराचं वर्णन करताना अनेकजण त्याला ‘जगातील सगळ्यात अलौकिक भुतिया वाडा’ (Ghost citiy), ‘ओसाडबाग’ असं वर्णन करतात. असं बिरुद लावतात. आग्रा तालुक्यातलं हे छोटंसं गाव, आजही फारसं गजबजलेलं नाही. आग्राहून 37 किमी दूर पश्चिम दिशेला, 400 वर्षांपूर्वी वसवलेलं हे शहर. तिसरा मोगल बादशहा मोहम्मद जलालुद्दीन अकबर याने सिक्रीच्या ओसाड माळरानावर एक संपूर्णपणे नवीन विचार आणि आयाम असलेलं शहर वसवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. तेव्हा उभारलं गेलं ते फतेहपूर सिक्री-फतेह अर्थात विजयाचं शहर! हे शहर पाहताना तुम्हाला त्यांच्या सौंदर्यग्रहणासाठी डोळ्यांचा जास्त प्रमाणात वापर करावा लागतो.

सिक्रीचा इतिहास-अकबराच्या पूर्वीचा

फतेहपूर सिक्रीची निर्मिती जरी अकबराने केली तरीही सिक्रीचा इतिहास अकबराच्या अगोदरचा आहे. सिक्री हे बाराव्या शतकापासून ‘सिकरवार राजपुतांच्या’ अधिपत्याखाली होतं आणि सिकरवारांवरून या ठिकाणाला सिक्री हे नाव पडलं. नंतर आलेल्या तुर्की आणि मोगल बादशहांना आणि सरदारांना सिक्रीचं हे पठार मोहिमेच्या आधी सैन्य गोळा करणर्‍यांसाठी आणि त्यांच्या छावण्यांसाठी योग्य वाटलं.
तसंच अकबर काही पहिला मोगल बादशहा नव्हे, ज्याचं लक्ष सिक्रीकडे गेलं. मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर यानेदखील सैन्यासाठीच सिक्रीला हेरून ठेवलं होतं, शिवाय बाबराने जवळच्याच एका नदीच्या प्रवाहावर बांध घालण्याचं काम सुरू करण्याचे आदेश दिले. जेणे करून तिथे एक तळं निर्माण होईल आणि सिक्रीची पाणीपुरवठ्याची गरज भागेल. उतारांवर बगीचेही लावण्याची सोय केली. हे सगळं मनुष्यवस्तीसाठी सिक्री अधिक सोयीची ठरावी म्हणून बाबरचा हा दूरदर्शीपणा पुढे वरदान ठरला.

कहाणी जोधा-अकबरची

1568 पर्यंत अकबर भारतातील सर्वांत मोठा सम्राट बनला होता आणि त्याची कीर्ती आणि दबदबा सर्वदूर पसरला होता; मात्र त्याने उभारलेलं एवढं मोठं साम्राज्य स्वत:नंतर सांभाळण्यासाठी त्याला मुलं आणि गादीला वारस नव्हता. अनेक पवित्र धामांना, तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन, दानं देऊन झालं, अनेक साधू-संत, मौलवी यांचे आशीर्वाद झाले, पण काही गुण आला नाही. शेवटी असंच सिक्रीच्या शेख सलीमउद्दीन चिस्ती, या सुफी संतांची कीर्ती अकबर बादशहाला सिक्रीपर्यंत रणरणत्या उन्हातून, तप्त वाळवंटातून अनवाणी खेचून घेऊन आली.

शेख सलीमउद्दीन चिस्ती यांनी अकबराला आशीर्वाद दिला की तुला तीन मुलं होतील आणि काही महिन्यातच हे भाकीत खरं ठरलं. अकबराची पहिली बायको जोधाबाई हिने एका मुलाला जन्म दिला आणि शेख चिस्तींचा आशीर्वाद खरा ठरला. म्हणून या नवजात मुलाचं नाव ठेवलं गेलं सलीम! (हाच पुढे जहांगीर म्हणून ओळखला गेला) पुढे आणखी काही महिन्यांतच अकबराच्या अजून दोघा बायकांनी गोड बातमी दिली आणि दोघींनाही मुलगे झाले.

पुत्रांच्या जन्माच्या आनंदात हरखून गेलेल्या बादशहा अकबराने निश्चय केला की सिक्रीच होईल त्याच्या साम्राज्याची नवी राजधानी! मात्र इतिहासकारांच्या मते, वारस मिळण्याचा आनंद हे फतेहपूर वसवण्यामागचं एकमेव कारण नसावं, तर ही नवी राजधानी मोगल साम्राज्याचं राजनैतिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्र बनू शकलं असतं, कारण फतेहपूर सिक्री अशा ठिकाणी होतं की ते मोगलांची राजकीय राजधानी आग्रा आणि कौटुंबिक श्रद्धास्थान असलेलं अजमेर (मोईनुद्दीन चिस्ती यांचा दर्गा) या दोघांत दुवा साधू शकलं असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक नवं शहर, नवी राजधानी बादशहाची सत्ता केंद्रीत करण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची ठरू शकली असती.

मूर्तिमंत अलौकिक वास्तुशिल्पकला

फतेहपूर सिक्रीत हिंदू-मुस्लीम स्थापत्त्यकला एकत्र नांदतात. फतेहपूर सिक्रीत हिंदू-मुस्लीम वास्तुकला समरस होऊन गेल्या आहेत. फतेहपूर सिक्रीचं नाव काढलं की डोळ्यांसमोर सर्वप्रथम येथं ते जामा मशीद, शेख सलीमउद्दीन चिस्तीचा दर्गा आणि बुलंद दरवाजा.

फतेहपूर सिक्रीत सर्वप्रथम कुठली इमारत बांधली गेली असेल, तर ती म्हणजे जामा मशीद. पूर्वेकडून बादशाही दरवाजातून आत आल्यावर मध्यभागी भव्य मोकळा परिसर आणि चारही बाजूंनी मोकळ्या खोल्या. कमानी आहेत. जिथे चिस्ती आपल्या अनुयायींना शिकवत असत. मधल्या मोकळ्या परिसरातच शेख सलीमउद्दीन चिस्ती यांचा दर्गा आणि नवाब इस्लाम खान यांची कबर आहे.
संपूर्णपणे लाल दगडात उभारलेल्या फतेहपूरमध्ये शेख सल्लीमउद्दीन चिस्तींचा दर्गा ही एकमेव श्वेतवर्णी संगमरवरी दगडातील वास्तू आहे. जहांगीर बादशहाचं या वास्तुला खरी शोभा आणली आहे. ती चारी बाजूला महीरपी संगमरवरी जाळीमुळे दूरदूरहून लोक दर्ग्यात येतात. दर्ग्याच्या संगमरवरी जाळ्यांना लाल भगवे धागे बांधतात, अशा दृढ श्रद्धेने की सलीमउद्दीन चिस्तींच्या आशीर्वादाने तेदेखील निपुत्रिक, राहणार नाहीत. दर्ग्यातील अंतर्गत नक्षीकाम, संगमरवरी जाळ्या; स्तंभ हे केवळ अप्रतिम! संगमरवरी जाळ्यांमुळे प्रकाशाचे होणारे परावर्तन पाहून डोळ्यांचे पारणे फिटते.

जामा मशिदीचं बांधकाम पूर्ण झाल्यावर काही वर्षांनीच बादशहा अकबराने रणथंबोरचा महाकाय गड काबीज केला आणि या विजयाचा प्रतिक म्हणून फतेहपूर सिक्रीला ‘बुलंद दरवाजा’ बांधला. बुलंद दरवाजा जणू अकबराचं प्रतिदर्शन घडवितो. जवळजवळ 50 फूट रुंद आणि 100 फूट उंच हा दरवाजा एका मजबूत आणि भव्य पायथ्यावर उभारलाय, जो जमिनीपासून 42 फूट उंचीवर आहे. दरवाजावर बसवलेल्या संगमरवरावर कुराणातील अनेक कलमं कोरली आहेत. दरवाजाच्या चौकटीवर आपल्याला तांबड्या आणि पांढर्‍या रंगाच्या संगमरवर दगडाचे मिश्र बांधकाम दिसेल! या वास्तुचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या वास्तुंची प्रमाणबद्धता व डौलदारपणा असा हा भव्यदिव्य ‘बुलंद दरवाजा’ मैलोन् मैल दूरदेखील अकबर बादशहाच्या बुलंद साम्राज्याचं प्रतिक बनून चमकत राहतो.

खरं सांगायचं तर इथली प्रत्येक वास्तू, प्रत्येक इमारत हिचं स्वत:चं वेगळेपण आणि सौंदर्य आहे. ‘दिवाण-ए-खास’ पाहून तर प्रेक्षक स्तंभित होतात. बाहेरून दुमजली दिसणारी ही वास्तू आतून एकमजलीच आहे. ‘दिवाण-ए-खास’मधील मध्यभागी उभा असलेला खांब सुरुवातीला चौकोन, मध्यभागी अष्टकोन व वर बहारदार शिल्पकृतीने भरलेला असून त्याच्या वर असलेल्या बैठकीला पेलून धरतो. त्या बैठकीपर्यंत जाण्यासाठी तीन बाजूंनी फरसबंदी असलेले कठडे आहेत. इतिहासकार म्हणतात त्याचा उपयोग अकबर सल्लामसलत करण्यासाठी करत असे. तर काही इतिहासकारांच्या मते तिथे तो आपला खजिना ठेवत असे. इथल्या ‘दिवाण-ए-खास’मधील गोलाकार वेदी आणि भव्य, पण अत्यंत कुशल कलाकुसर असलेला स्तंभ डोळ्यांचं पारणं फेडतात.

फतेहपूर सिक्रीचा अस्त!

एवढं अलौकिक शहर, एवढे कष्ट करून बांधलेलं अमाप पैसा खर्च करून उभारलेला, पण उभारल्यावर पंधरा वर्षांतच संपूर्ण दरबार, सर्व माणसं, सारे व्यापार-धंदे, सगळ्यांनी गाशा गुंडाळला आणि निघून गेले.
कुणी म्हणतं तळं आटलं आणि पाण्याची कमतरता भासू लागली म्हणून; तर कुणी म्हणतं आग्रा आणि सिक्री इथे दोन्हीकडे व्यवहार सांभाळणं कठीण गेलं म्हणून; तर कुणी म्हणतं उत्तरेकडून होणारी आक्रमणं रोखण्याकरिता बादशहाने तळ हलवला. अनेक कारणं दिली जातात, पण खरं काय ते इतिहासालाच ठाऊक.

चंद्रेच्या कलेप्रमाणे फतेहपूर सिक्रीच्या वैभवाने पौर्णिमा गाठली. पण त्याच चंद्रेच्या कलेप्रमाणे याच सिक्रीच्या वैभवाला ओहोटी लागून अमावस्या गाठली. आज मात्र तिथले सोनेरी नक्षीकाम ओसरलं, रंगीत चित्र धुसर झाली आहेत. इमारतींची पडझड झाली, तलाव आटलाय, गुलाबं, सुकली आहेत आणि मागे राहिलंय ती अकबराची औट घटकेची राजधानी फक्त लाल दगडातलं चिरेंबदी पण एकाकी वैभव!

- श्वेता विनायक सावंत (B.A. in History)
सी-702, सोनी पॅराडाईज को-ऑप., टी.व्ही.एस.-घ्घ्घ्
वजिरा नाका, बोरिवली (प.), मुंबई - 400 091.
भ्र. 99694 93873

- नितेश दिनेश राव (B.A. in History)
आरे कॉलनी, युनिट नं 31,
माळी नगर, गोरेगाव (पू.), मुंबई - 400 065
भ्र. : 99670 83129